जेव्हा शिवसेनेत फूट पडून आमदारांचा मोठा गट भाजपाला जाऊन मिळाला तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पहिले आमदार होते जे भाजपाला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होऊ, असे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला.
आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांच्या अगोदर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आग्रही होते. आम्ही सर्व पहिल्या टर्मचे असलेल्या आमदारांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी भाजपसोबत जावे लागले तरी चालेल असा आग्रह पवार यांनी केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अगोदर रोहित पवार यांनी ही आग्रही भूमिका शरद पवारांजवळ मांडली होती, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.
‘रोहित पवार (Rohit Pawar) गेल्या काही वर्षापासून राज्यात दादा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी दुसऱ्याला स्वार्थी म्हणू नये, असा टोलाही आमदार सुनिल शेळके यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार आमदार झाल्यापासून त्यांना अजित पवार यांनी २ हजार कोटी रुपये निधी दिला आहे. राज्यात फक्त एकच दादा आहेत ते म्हणजे अजितदादा असेही मिटकरी म्हणाले.
(हेही वाचा Chandrayaan 3 : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अद्याप स्लीप मोडवर; शनिवारी इस्रो करणार रिलाँन्च)
Join Our WhatsApp Community