कर्जत जामखेड मतदारसंघाचे (Karjat Jamkhed Assembly constituency ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मतदारसंघातील मतदारांनी एकप्रकारे घरचा आहेर दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वी रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यात जाऊन स्नान केले होते. त्यानंतर पवारांचे स्नान केलेल्यानंतर गंगेचे पाणी बॉटलमध्ये भरल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच फोटोचा वापर करत कर्जत जामखेड मतदारसंघात ‘आम्ही मतदार’ असे लिहत, ‘कसंही करून सत्तेत या कर्जत- जामखेडला न्याय द्या’ अशा आशायाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमुळे मतदारांची नाराजी पाहता मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा : बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात)
विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly elections) राज्यात महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सत्ता येईल आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांना मंत्री पद मिळेल असे काहींना वाटत होते. कर्जत येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेत तसे पवारांनी जाहीरही केले होते. मात्र, राज्यात महायुतीने (Maha Yuti) मोठे यश मिळवत सत्ता काबीज केली.यामुळे मतदारसंघात रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या समर्थकांत आणि मतदारांमध्ये काहीशी निराशा निर्माण झाली. त्यात आज पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील रोहित पवार (Rohit Pawar) तुम्ही मतदार संघातील जनतेसाठी कसे ही करून सत्तेत सहभागी व्हा या फलकाचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे मोठी खळबळ मतदार संघात उडाली आहे. (Rohit Pawar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community