महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (२४ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ११ तास चौकशी केली होती.
(हेही वाचा – Corruption In India : भारतात भ्रष्टाचारात वाढ; डेन्मार्कमध्ये शून्य भ्रष्टाचार)
१ फेब्रुवारी रोजी पुन्हा चौकशी –
ईडीने समन्स बजावल्यानंतर रोहित पवार बुधवार, २४ जानेवारी रोजी सकाळी दक्षिण मुंबईतील बल्लार्ड इस्टेट येथील एजन्सीच्या कार्यालयात हजर झाले. रात्री १० वाजेच्या सुमारास चौकशीतून बाहेर पडल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, ते एजन्सीला सहकार्य करत आहेत आणि १ फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानुसार आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांची चौकशी होणार आहे.
(हेही वाचा – Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील)
नेमकं प्रकरण काय ?
२५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकघोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल ११ तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारेच ईडीने (Rohit Pawar) ईसीआयआर दाखल करुन चौकशीला सुरुवात केली आहे.
(हेही वाचा – LPG Cylinder Price : अर्थसंकल्पाच्या आधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ)
सुप्रिया सुळेंचा पाठिंबा –
रोहित पवार (Rohit Pawar) यांची २४ जानेवारी रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत दिली. सुळे यांनी रोहित पवारांना मिठी मारली आणि त्यांनी तपास संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सुळे यांच्या पायांना स्पर्श केला. (Rohit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community