रोहित पवारांची ED कडून साडेआठ तास कसून चौकशी; पुन्हा कधी होणार चौकशी?

337
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांची गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी ED ने तब्बल साड़े आठ तास कसून चौकशी केली. दुपारी १ वाजताच्या दरम्यान ते ED कार्यालयात दाखल झाले, त्यानंतर रात्री ९.१५ वाजता कार्यालयातून बाहेर पडले. जेव्हा रोहित पवार कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

काय म्हणाले रोहित पवार?

यावेळी रोहित पवार यांनी, देशात आणि राज्यात चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही विचारांसाठी लढत आहोत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना वाटत असेल की, आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचे आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले, सर्वांनी बघितले आहे, पण आम्ही घाबरणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच, आज बजेटचा दिवस असल्यामुळे सुप्रिया सुळे लोकसभेला गेल्या आहेत. सुप्रिया सुळे महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुद्दे मांडत आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील लोकसभेत आपली जाबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा राष्ट्राला व्हावा म्हणून शरद पवार हे राज्यसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावत आहेत. नाहीतर काही लोक फक्त नावासाठी आमदार, खासदार बनतात. पण आपले खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असेही राहोत पवार यावेळी म्हणाले. दरम्यान रोहित पवार यांना 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा EDच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.