-
मुंबई प्रतिनिधी
महायुतीतील तब्बल २० बड्या मंत्र्यांना अधिकृत बंगले मिळाल्यानंतरही त्यांनी आमदार निवासातील (MLA Residence) खोल्या अद्याप रिकाम्या केल्या नाहीत. या संदर्भात २८ फेब्रुवारीपर्यंतची नोटीस देण्यात आली होती. मात्र, अजूनही या खोल्या ताब्यातच आहेत, त्यामुळे अनेक आमदारांना राहण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मनोरा आणि मॅजेस्टिक आमदार निवास (MLA Residence) दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असल्याने अनेक आमदारांसाठी मुंबईत राहण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे सरकार दरमहा प्रत्येकी एक लाख रुपये भाड्याने देत आहे. अशा परिस्थितीत, अधिकृत बंगले मिळूनही मंत्र्यांकडून आमदार निवासातील (MLA Residence) खोल्या न सोडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
(हेही वाचा – Shubman Gill : सचिन, विराटनंतर शुबमन गिलही झळकणार एमआरएफच्या जाहिरातीत)
या मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन, नितेश राणे, हसन मुश्रीफ, संजय शिरसाट, योगेश कदम, जयकुमार रावल, शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांसह इतर अनेक बड्या मंत्र्यांचा समावेश आहे.
आमदारांसाठी निवासाची (MLA Residence) सुविधा नसताना मंत्री मात्र खोल्या ताब्यात ठेवत असल्याने सरकारच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत प्रशासन आणि सरकार कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community