मोदी RSS चे स्वयंसेवक आहेत, परंतु…; पंतप्रधानांबाबत मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

180

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. पीएम मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेत. परंतु, संघ स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत नाही, असे भागवत म्हणाले.

(हेही वाचा – श्रद्धा हत्याकांडानंतर साध्वी प्राची भडकल्या, ‘…आता आफताबचे 500 तुकडे करा’)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे नियंत्रण नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी स्वयंसेवक आहेत यात शंका नाही. विश्व हिंदू परिषद चालवणारे देखील स्वयंसेवक आहेत, परंतु सर्वजण त्यांचे कार्य स्वतंत्रपणे करतात. पंतप्रधान मोदींचे स्वयंसेवक म्हणून वर्णन करणे अगदी योग्य आहे. विहिंपचाही आरएसएसशी संबंध आहे. पण यापैकी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण नाही. मोहन भागवत हे शुक्रवारी जबलपूरमध्ये एका मेळाव्याला संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. संघ म्हटल्यावर लोक मोदीजींचे नाव घेतात. मोदीजी आमचे स्वयंसेवक आहेत. संघात तुम्हाला विश्व हिंदू परिषद दिसते. विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक आहेत. त्यांचे विचार आणि मूल्ये स्वयंसेवकांसारखीच आहेत. परंतु, ही सर्व स्वयंसेवकांनी केलेली स्वतंत्र कामं आहेत. ही संघटन नाहीये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी आणि विहिंप दोघेही मार्गदर्शन घेण्यास मोकळे आहेत. मार्गदर्शनही घेतात. हिंदू धर्म ही जीवनपद्धती आणि परंपरा असल्याचा पुनरुच्चार आरएसएस प्रमुखांनी केला. भारतात राहणारे विविध पंथाचे, जातीचे आणि प्रांताचे लोक ते जपतात, असेही भागवत यांनी सांगितले. आदर्श समाजाच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्वांनी संघाचा एक भाग बनण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणी संघाच्या विरोधात असला तरी त्याने आपल्या पद्धतीने समाज बांधणीत योगदान दिले पाहिजे, असे भागवत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.