RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी; राहुल गांधी यांच्या वक्तव्याने नवा वाद

178

लंडन दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. आरएसएस ही फॅसिस्ट संघटना असून भारतातील लोकशाही मोडण्यासाठी तयार झालेली गुप्त संघटना असल्याचे गांधी यांनी म्हटले. लंडन येथील चॅथम हाऊस येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे भाष्य केले. चॅथम हाऊस ही लंडन येथील एक थिंक टँक संस्था असून यातील संवाद, चर्चात्मक कार्यक्रम बंदिस्त असतात. मात्र, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

आरएसएस ही गुप्त संघटना असून मुस्लिम ब्रदरहूड सारखे या संघटनेचे काम चालते. लोकशाहीचा वापर करून सत्तेत येणे आणि हाती सत्ता आल्यावर लोकशाहीच नष्ट करण्याचे काम संघ करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. भारतातील विविध संस्था काबीज करण्यात किती यशस्वी झाले आहेत, याचे आश्चर्य वाटत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, संसद, निवडणूक आयोग आदी सर्व संस्था दबावाखाली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल यांनी ब्रिटनच्या संसदेतील खासदार, शैक्षणिक, पत्रकार आणि समुदायाच्या नेत्यांशीही संवाद साधला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार आहे. विशेष म्हणजे परदेशात जाऊन राहुल गांधी भारताची बदनामी करत असल्याचं संदेश जात असल्यामुळे याचे काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

(हेही वाचा राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.