मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर आता भैय्याजी जोशी यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. याविषयावर महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनातही हा विषय विरोधकांनी लावून धरला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला.
(हेही वाचा भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर CM Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका; म्हणाले…)
मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटते. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालते. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की, बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही, असे भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community