‘या’ लोकांनी आवर्जून ‘काश्मीर फाइल्स’ बघावा, मोहन भागवत म्हणाले…

104

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटावरून अनेक वाद-प्रतिवाद सुरू आहे. हा चित्रपट देशभरातील सर्वांना पाहता यावा यासाठी संबंधित राज्य सरकारांनी तो आपल्या राज्यात टॅक्स फ्री करावा अशी मागणी भाजपने केली आहे. देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दरम्यान, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे. मोहन भागवत यांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाचे तोंड भरुन कौतुक केलं. यासंदर्भात मोहन भागवत म्हणाले, ‘सत्य शोधणाऱ्या सर्वांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहावा’. चित्रपटाची स्क्रिप्ट उत्तमरीत्या लिहिली गेली असून ती बनवण्यासाठी व्यापक संशोधनाचा वापर करण्यात आला आहे, असं म्हणत त्यांनी कौतुकही केले आहे.

(हेही वाचा – ‘द काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला सुरक्षेचे ‘वाय’ कवच!)

११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार या अभिनेत्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पाहावा. सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. या चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. त्यामधून पूर्ण कलात्मकता दिसते. यासाठी बरेच संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळेच सत्य काय आहे याची जाण ज्यांना आहे त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.