मंदिराचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला! सरसंघचालकांचा आरोप 

130

अध्यात्म साधनेसाठी तर मंदिरे आहेतच, परंतु मंदिरे म्हणजे समाज जीवनाची केंद्रे होती. सर्व संस्कृतींमध्ये केवळ भारतीय संस्कृतीच भौतिकतेच्या पलिकडे जाऊ शकली. मंदिरांमध्ये पाठशाळा चालतात, मंदिरांबरोबर अर्थव्यवस्था, कृषिक्षेत्र, व्यापार, इत्यादींचे संबंध जोडलेले असतात. मंदिरे ही समाजाच्या धारणेची साधने होती. मंदिरांकडे पाहून आपल्या पराक्रमाचा गौरव कळतो. त्यामुळेच मंदिरांचा इतिहास आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

मंदिरांचा व पराक्रमांचा इतिहास आधीही दडवला   

दीपा मंडलिक लिखित पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दादर येथील सावरकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, पराक्रमी राजे भव्य मंदिरे निर्माण करीत असत. परंतु असे असूनही, त्यांनी मंदिरांवर स्वतःचा अधिकार ठेवला नाही, तर ही मंदिरे समाजाला अर्पण केली. तिरुवनंतपुरम, कालहस्ती, सोमनाथ, इ. ठिकाणच्या मंदिरांच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत दीपा मंडलिक लिखित या पुस्तकातून मंदिरांकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असावी हे कळते, अशी प्रतिक्रियाही भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वांनी एकजूट दाखविल्याने हे मंदीर उभे राहिले. एका मंदिरासाठी प्रदीर्घकाळ आंदोलन का करावे लागले, अशी विचारणा करत, पक्ष आणि सर्व भेद विसरून सर्वांनी एकजूट दाखविल्याने हे मंदीर उभे राहिले. मंदिरांचा व पराक्रमांचा इतिहास आधीही दडविला गेला आणि स्वातंत्र्योत्तर काळातही तिच परंपरा सुरू राहिली. शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांमधूनही तो फारसा उलगडला नाही. पण संशोधक, लेखक आणि इतिहासकारांनी तो लोकांपर्यंत पोचविला. प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती. केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरापासून देशभरातील अनेक मंदिरे ही स्थापत्यशास्त्र आणि अन्य क्षेत्रांतील भारतीयांचे ज्ञान किती प्रगत होते, याचा प्रत्यय देतात, असे भागवत यांनी नमूद केले.

(हेही वाचा क्रीडा क्षेत्रातही रशियावर प्रतिबंध! कोणत्या स्पर्धांमधून केले हद्दपार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.