RSS : हरियाणात कमळ फुलवण्यासाठी संघ मैदानात

126
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने BJP ची खरडपट्टी का काढली ?

वंदना बर्वे 

हरियाणात भाजपाला (Haryana Assembly Elections 2024) तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (Rashtriya Swayam Sevak Sangh) निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. संघांचे स्वयंसेवक सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी जाऊन सरकारी धोरणांवर चर्चा करून भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहे.  (RSS)
हरियाणात भाजपाची हॅट्ट्रिक करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही मैदानात उतरला आहे. आता हरियाणात भाजपा उमेदवाराच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते काम करीत आहेत. ज्या जागांवर भाजपा थोडा कमकुवत वाटतो त्या जागांवर संघाचे विशेष लक्ष असणार आहे.
भाजपा आणि संघ कार्यकर्त्यांनी या जागांवर थोडी मेहनत घेतली तर निकाल अनुकूल लागू शकतो असा संघाला विश्वास आहे. त्यामुळे आरएसएसने (Rashtriya Swayam Sevak Sangh) आपल्या पारंपरिक पद्धतीने काम सुरू केले आहे. संघाचे कार्यकर्ते घरोघरी जात आहेत. (RSS) केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही सार्वजनिक ठिकाणी चर्चा केली जात आहे. हरियाणात मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सूत्रानुसार, गेल्या काही दिवसांत भाजपने स्टार प्रचारकांसह बूथ स्तरावर पन्ना प्रमुखांची सक्रियता वाढवली आहे.
आरएसएसही (RSS) सक्रिय झाला आहे. “जहाँ कम वहाँ हम” अशी घोषणा देत संघ मैदानात उतरला आहे. भाजप ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या जागांवर संघ मेहनत घेणार आहे. हरियाणात यमुनानगर, अंबाला, पंचकुला, कुरुक्षेत्र, हिसार, सोनीपत आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये 23 हून अधिक विधानसभा जागा आहेत, जिथे चुरशीची स्पर्धा आहे. या जागांवर भाजपाने आघाडी घेतल्यास तिसऱ्यांदा सत्तेचा मार्ग सुकर होऊ शकतो.

भाजपाने पूर्ण ताकद लावली

भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, गेल्या काही दिवसांत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.  सर्वोच्च नेतृत्वाने आता आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. महत्वाचे म्हणजे, संघाची टीम स्वतंत्रपणे काम करणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा आणि आरएसएसमध्ये उमेदवार निवडीपासून बूथ लेव्हल मॅनेजमेंटपर्यंत चर्चा झाली होती. आरएसएसच्या (RSS) सूचनेनंतर भाजपने यावेळी २५ हून अधिक नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. (RSS)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.