राम मंदिर घोटाळ्यावर संघ, विहिंप आणि केंद्राने खुलासा करावा! संजय राऊतांची मागणी 

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी श्रीराम मंदिर निर्माणावरील जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी जगभरातून निधी जमा झाला आहे. सर्वसामान्यांकडून निधी जमवण्यात आला. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ कोटी रुपयाचा निधी दिला होता. श्रद्धेपोटी सर्वांनी मंदिरासाठी निधी दिला आहे. त्यात जर घोटाळा होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद, केंद्र सरकार आणि राम मंदिर निर्माण समितीचे प्रमुख या सर्वांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

(हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती हाच उपाय! छत्रपती शाहू महाराजांची सूचना )

मंदिर निर्माण ट्रस्टवर भाजपचेच सदस्य! 

श्रीराम मंदिर निर्माणाचा निर्णय झाला तेव्हा केंद्र सरकारने समिती स्थापन केली. त्यामध्ये आमचाही एखादा सदस्य घ्यावा, अशी अपेक्षा होती, मात्र केंद्र सरकारातील भाजपने सर्व सदस्य त्यांचेच घेतले आहे, त्यामुळे याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे, असेही शिवसेने नेते संजय राऊत म्हणाले. राम मंदिराच्या नावाखाली जमीन घोटाळा समोर आल्याने आमची श्रद्धा दुखावली आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वात आधी समोर येऊन याबाबत काय तो खुलासा करणे गरजेचे आहे. राम मंदिर लढा हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. याचे सर्वांनी राजकारण केले, मात्र आम्ही केले नाही. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. हा गंभीर आहे. त्यामुळे हा श्रद्धेचा गैरवापर आहे. त्यामुळे श्रद्धेला काही अर्थ उरत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here