Disha Salian मृत्यू प्रकरणाचे पडसाद विधानसभेत; Aaditya Thackeray यांच्या अटकेची जोरदार मागणी

100
दिशा सालियन प्रकरणावर Aditya Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया
  • खास प्रतिनिधी 

दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरण गुरुवारी विधानसभेतही गाजले. सत्ताधारी भाजपा-शिवसेना आमदारांनी सभागृहात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना या प्रकरणी अटक करण्याची जोरदार मागणी केली आणि सभागृहात गोंधळ घातला. यामुळे शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सभागृह तहकूब

दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणावरून झालेल्या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी कोणताही राजकीय पक्षाची व्यक्ती या प्रकरणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

(हेही वाचा – पनवेल बसस्थानकाचे काम लवकर सुरू करा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचे आदेश)

उबाठा गैरहजर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी गप्प

सभागृहात कोणत्याही सदस्याने आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव घेतले नाही मात्र तत्कालीन शासनातील एक मंत्री असा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. यावेळी सभागृहात शिवसेना उबाठाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता तर सभागृहाबाहेर आदित्य ठाकरे यांची पाठराखण करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) पक्षाच्या आमदारांनी सभागृहात एक शब्दही न उच्चारता कानावर हात ठेवले.

तत्कालीन मंत्री, महापौरांची चौकशी

भाजपाचे आमदार अमित साटम यांनी गुरुवारी २० मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणावर सभागृहाचे लक्ष वेधले. साटम यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देत शासनाने दिशाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती तिचा अहवाल जनतेसमोर कधी ठेवणार, असा सवाल शासनाला केला. तसेच दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जी नावे घेतली आहेत, त्यात दिशा सालियनचे (Disha Salian) चार मित्र आहेत, तत्कालीन शासनातील मंत्री आहेत, मुंबई शहराच्या तत्कालीन महापौर आहेत, अशी माहिती दिली आणि या सर्व व्यक्तींची चौकशी एसआयटी करणार का? गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचे कस्टोडियल इंटेरोगेशन करणार का? असे प्रश्न उपस्थित केले.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी Rohit Pawar मैदानात; भाजपावर राजकारणाचा आरोप)

चौकशीला गती

साटम यांच्या मुद्द्याला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी पाठिंबा देत प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी, अशी मागणी केली. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. पण चौकशी अधिक जलद गतीने केली जाईल. दिशा सालियन (Disha Salian) यांच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करू.”

आरोप झाले त्यांना अटक करा

मंत्री नितेश राणे यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की, अशा बलात्कार प्रकरणात ज्या व्यक्तीवर आरोप होतो त्यांना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी करायला लागते. काल सतीश सालियन यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या व्यक्तींना अटक करावी. एवढीच आमची मागणी आहे,” असे राणे म्हणाले.

(हेही वाचा – Budget Session : मविआचा सभापती-अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप; विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन)

शिवसेनेचा पाठिंबा

“नितेश राणे यांच्या मताशी मी सहमत आहे. जो नियम सामान्य माणसाला आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असायला हवा. त्यामुळे या प्रकरणी संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून चौकशी करावी. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांवरही कारवाई केली होती,” असे मत मंत्री शंभुराज देसाई (शिवसेना-शिंदे) यांनी व्यक्त केले.

‘न्याय द्या, न्याय द्या’

त्यानंतर भाजपा आणि शिवसेना आमदारांनी ‘न्याय द्या, न्याय द्या’, ‘अटक करा, अटक करा’ अशा घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतले आणि सभागृहाचे कामकाज रोखले. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृह १० मिनिटे तहकूब केली. १० मिनीटानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच सत्ताधाऱ्यांनी पुन्हा तोच विषय सुरू केला. अखेर अध्यक्षांनी मंत्र्यांना यावर शासनाची भूमिका स्पष्ट करावे असे सांगितले.

(हेही वाचा – मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम; AC Local Task Force द्वारे तक्रारींचे १०० टक्के निराकरण होणार)

याचिकेत सरकारही पार्टी

त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, “मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की सदर प्रकरणात कुठलीही राजकीय व्यक्ती असो, कुठल्याची पक्षाची असो, कायदा सगळ्यांना सारखा आहे. कोणालाही यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही. कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि काठोर कारवाई केली जाईल. जी याचिका न्यायालयात दाखल केली गेली आहे, त्यात त्यांनी सरकारलाही पार्टी केले आहे, त्यामुळे त्यांचे म्हणणे आपल्याकडे आल्यानंतर योग्य ती कारवाई करू.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.