संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी ज्या मराठी माणसाने योगदान दिले, तोच मराठी माणूस आज मुंबईतून हद्दपार होत चालला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘हुतात्मा चौक’ उभारण्यात आला. हा चौक हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला असून याला ‘हुतात्मा चौक’ असे न संबोधता, ‘हुतात्मा स्मारक’ असे नामकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महापालिकेने स्वीकारला होता. परंंतु आजवर याबाबत कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.
हुतात्मांच्या बलिदानाचा विसर
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या हुतात्मा स्मारकाचा विसर पडला आहे, असा आरोप भाजपच्या अमित साटम यांनी केला आहे. १०७ हुतात्मांच्या बलिदानाचा गजर करत आपण आपला राजकीय स्वार्थ साधून घेता, परंतु त्याच हुतात्मा स्मारकाचे सत्ताधारी शिवसेनेला स्मरण राहत नाही. २०१७ साली नामकरणाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ४ वर्षे ६ महिने पूर्ण झाले आहेत. परंतु कोणतीच हालचाल न झाल्यामुळे आपले मराठी अस्मिता व त्याविषयीचे प्रेम किती आहे, हेच सिद्ध होते, अशी टीका अमित साटम यांनी केली आहे.
( हेही वाचा : महाविकास आघाडी सरकारची २ वर्ष आणि १० संघर्ष! जाणून घ्या कोणते… )
नामकरणासाठी तत्परता का नाही?
सत्ताधारी शिवसेनेने ज्या तत्परतेने काळ्या यादीतील कंत्राटदारांना बाहेर काढून मुंबईकरांना लुटण्यासाठी मोकळे रान दिले, तीच तत्परता हुतात्मा स्मारकाच्या नामकरणासाठी का नाही?, असा खोचक सवाल करत अमित साटमांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना केली आहे.
Join Our WhatsApp Community