मध्यरात्री रस्त्यातच गाडीने घेतला पेट; औरंगाबादहून मुंबईला येताना मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्…

117

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून सातत्याने राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते दौरा करून लोकांना भेटत आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी जनतेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते नेहमी सामान्याच्या मदतीला तत्पर असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

काय घडला प्रकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादहून मुंबईत परतत असताना सोमवारी मध्यरात्री उशिरा विलेपार्ले परिसरात एका गाडीने अचानक पेट घेतला होता. रस्त्यात गाडीने अचानक पेट घेतला आहे हे पाहताच मुख्यमंत्री शिंदेंनी आपला ताफा क्षणाचाही विलंब न करता थांबवला, आणि ते थेट संबंधित वाहन चालकाच्या मदतीला धावून गेले. त्याची विचारपूस केली मुख्यमंत्र्याचे आश्वासक शब्द ऐकताच या तरूणाला रडू कोसळले. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

(हेही वाचा – लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई देणार; राज्य शासनाचा निर्णय)

शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका तरुणाची विचारपूस करताना दिसत आहे. शिंदेंनी तरुणाला नाव विचारलं, त्यानंतर “घाबरू नको, जीव वाचला हे महत्त्वाचं आहे. गाडी आपण नवी घेऊ”, असं म्हणत त्यांनी त्याची समजूतही काढली. हे ऐकताच या तरुणाला रडू कोसळल्याचेही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिंदेंनी पोलिसांशी चर्चा करून त्याच्यासोबत कोण आहे का वगैरे चौकशी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.