चाकणकरांना धमकी देणा-याच्या दाव्याने सगळेच हैराण

152

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना सोमवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर यामागे काणोचा हात आहे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. त्या व्यक्तीला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, माझ्या मेंदूचा सॅटेलाईटद्वारे कोणीतरी ताबा घेतल्यामुळे माझ्याकडून हे कृत्य झाल्याचा हास्यास्पद खुलासा त्याने केला आहे. त्याच्या या कबुलीमुळे पोलिस देखील चक्रावले असून, सगळेच हैराण झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातून घेतले ताब्यात

दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात रुपाली चाकणकर यांना सोमवारी एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. या व्यक्तीने 24 तासांत जीवे मारण्याची धमकी रुपाली चाकणकर यांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता. धमकी देणारा इसम भाऊसाहेब शिंदे याला अहमदनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी आपल्या चौकशीत त्याने भलताच कांगावा केला आहे.

(हेही वाचाः रुपाली चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी)

आरोपीचा कांगावा

काही व्यक्तींनी माझ्या मेंदूचा सॅटेलाईटद्वारे ताबा घेतला आहे. माझ्या पत्नीला देखील अशाच पद्धतीने त्रास देण्यात येत आहे. याबाबतची तक्रार देखील आम्ही राज्य महिला आयोगाकडे केली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असा धक्कादायक खुलासा धमकी देणा-या व्यक्तीने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.