‘रुपया घसरत नाहीय तर डाॅलर मजबूत होतोय’;अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान

147

मागच्या काही दिवसांपासून रुपयाचे मूल्य घटत आहे. मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल 83 पैशांनी घसरले होते. डाॅलरच्या तुलनेत रुपया सातत्याने घसरत असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपया घसरत नसून डाॅलर सातत्याने मजबूत होत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेतील वाॅशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे प्रयत्न

या पत्रकार परिषदेत आगामी काळात रुपयासमोर कोणकोणती आव्हाने आहेत? तसेच, या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत? असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, रुपया घसरत नाहीय तर डाॅलर सातत्याने मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाने चांगली कामगिरी केली आहे. अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करत आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. रुपया सध्या डाॅलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया 8 पैशांनी घसरला आणि डाॅलरच्या तुलनेत 82.32 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 82.24 झाले होते.

( हेही वाचा: बोरिवली ते ठाणे फक्त २० मिनिटांत प्रवास; तयार होणार भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.