G20 घोषणापत्राचे रशियाकडून कौतुक; युक्रेनीकरण होऊ दिले नसल्याबद्दल व्यक्त केले स्वागत

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी G20 चे राजकारण करण्याचे प्रयत्न थांबवल्याबद्दल भारताचे आभार मानले.

140

भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेचे रशियाने स्वागत केले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी G20 शिखर परिषदेत युक्रेन युद्धाचे वर्चस्व गाजवू न दिल्याबद्दल भारताचे कौतुक केले. भारताने G20 अजेंड्याचे युक्रेनीकरण होऊ दिले नाही. अशा जाहीरनाम्याची आम्हाला अपेक्षा नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही पहा –

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी G20 चे राजकारण करण्याचे प्रयत्न थांबवल्याबद्दल भारताचे आभार मानले. ही शिखर परिषद नक्कीच यशस्वी झाली आहे. G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या घोषणेवर एकमत झाल्याबद्दल लावरोव्ह म्हणाले, “जेव्हा त्यांनी हे मान्य केले, तेव्हा कदाचित हा त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा आवाज होता. खरे सांगायचे तर, आम्हाला याची अपेक्षा नव्हती. आम्ही युक्रेन आणि रशियाचा उल्लेख असलेली विधाने उर्वरित घोषणेपासून वेगळे करू शकत नाही. G20 खरोखरच त्याच्या मुख्य उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Satara Riots : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे साताऱ्यात दंगल; इंटरनेट सेवा बंद)

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाश्चिमात्य देशांवर टीका 

पाश्चिमात्य देशांवर टीका करताना रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, पाश्चिमात्य देश आपले वर्चस्व टिकवून ठेवू शकणार नाहीत, कारण आपण जगात सत्तेची नवी केंद्रे पाहत आहोत. ते म्हणाले, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विकसनशील देशांना दरवर्षी 100 अब्ज अमेरिकी डॉलर देण्याच्या आश्वासनावर पश्चिमेने काहीही केले नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम होऊ शकतो असे त्यांना वाटते का असे विचारले असता, रशियन परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह म्हणाले की, या क्षणी युक्रेनियन अधिकारी रशियन लोकांना शारीरिकरित्या नष्ट करण्याची धमकी देत आहेत. प्रत्येकाला शांतता हवी आहे. सुमारे 18 महिन्यांपूर्वी, आम्ही या संघर्षाचे निराकरण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याचे मान्य केले. त्यानंतर अँग्लो-सॅक्सन्सनी झेलेन्स्कींना त्यावर स्वाक्षरी न करण्याचे आदेश दिले. कारण त्यांना वाटले की ते आमच्याकडून काही कबुलीजबाब मिळवू शकतील, असेही परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.