८ व्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. (Russia Praises India) तसेच रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले. “रशियाच्या सहकारी देशांकडून शिकण्यासारखे आहे. यात भारताचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी भारतात उत्पादित केलेल्या कार आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना भारतात तयार झालेल्या ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देऊन योग्य काम करत आहेत. रशियातही ती वाहने उपलब्ध आहेत आणि आपण ती वापरली पाहिजेत,” अशा शब्दात पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांचा गौरव केला आहे.
दिल्लीत झालेल्या जी२० परिषदेला व्लादिमिर पुतिन उपस्थित राहिले नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्याविषयी चर्चा चालू आहे.
(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे – आदिवासी एकता समिती)
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांच्याकडून जी-२० परिषदेचे कौतुक
दिल्लीतील ‘जी-२०’ समूहाची शिखर परिषद अत्यंत यशस्वी झाली. जगभरातील अनेक नेते या परिषदेला उपस्थित राहिले. या परिषदेत अनेक सूत्रांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली . युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली होती. दिल्ली घोषणापत्रात रशियाचा उल्लेख न झाल्याने संतुष्ट झालेल्या लाव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘जी-२०’तील कामगिरीचे कौतुक केले होते. (Russia Praises India)
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह म्हणाले होते, “युक्रेन मुद्दय़ावरून पाश्चिमात्य देशांना शिखर परिषद दावणीला बांधता आली नाही. जी-२० शिखर परिषद युक्रेनमय करण्याचा पाश्चात्य देशांचा हेतू फोल ठरवण्यात आम्ही यशस्वी झालो. ‘जी-२०’ समूहावर आता पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व राहू शकणार नाही. जगात नवे सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वैयक्तिक लाभासाठी जी-२० व्यासपीठाचा कुठल्याही देशाने दुरुपयोग करू नये.” (Russia Praises India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community