रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त असल्याचे म्हटले आहे. मॉस्को येथील Valdai Club कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांनी भारत आणि रशियात चांगली मैत्री असून कोणत्याही मुद्द्यावरून मतभेद नाही. तर दोन्ही देशांध्ये आता कोणताही प्रलंबित प्रश्न नसल्याचे सांगितले.
काय म्हणाले पुतीन
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त आहेत. काही गोष्टी मर्यादित करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न होत असतानाही ते स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास सक्षम आहेत. भारताकडे उज्वल भविष्य असल्याची तसेच जागतिक घडामोडींमध्ये वाढती भूमिका असेल याची मला खात्री आहे, अस पुतीन म्हणाले.
(हेही वाचा – नोटांवरील फोटोंचे राजकारण: केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “…हीच संपूर्ण देशाची इच्छा”)
पुढे ते असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृवाखाली मागच्या काही वर्षात देशाने अनेक गोष्टी केल्यात. खरंच पंतप्रधान मोदी एक देशभक्त आहेत. मेक इन इंडियासाठी त्यांचा विचार आर्थिक आणि नौतिक दोन्ही रूपातून अर्थपूर्ण आहे. ब्रिटीश वसाहत ते स्वतंत्र देशापर्यंत भारताने मोठा पल्ला गाठला आहे. आमचे विशेष संबंध असून आमच्यामध्ये कधीही कठीण समस्या निर्माण झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांना पाठिंबा दिला असून सध्याही तेच करत आहोत. भविष्यातही असेच असणार याची मला खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community