तर तिसरे महायुद्ध अटळ! जो बायडेन यांनी काय दिला इशारा?

129

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामध्ये अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये युद्धासाठी आपले सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र युक्रेनच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. जर नाटो युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धाच्या मैदानात उतरणार नाही. जर नाटो देश या युद्धात उतरले तर सरळ संघर्ष होईल आणि यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पत्रकार परिषदेत दिला.

झेलेंस्कीची अमेरिकेसोबत चर्चा

बायडन यांनी हे विधान अशावेळी केले आहे, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्कीहे रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिका आणि नाटो देशांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. शुक्रवारीही झेलेंस्कीने अमेरिकेसोबत फोनवर चर्चा केली. यादरम्यान आपण युद्धाची परिस्थिती आणि रशियन सैनिकांकडून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितले. आम्हाला हे जाणवले की रशियाला रोखण्यासाठी त्यांच्यावर आणखी प्रतिबंध लावणे गरजेचे आहे.

(हेही वाचा ‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना! मनसेची खोचक टिका)

रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक आहेत आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. अमेरिका आणि युरोपियन युनियनने निर्णय घेतला आहे की ते व्यापारात रशियाला प्राधान्य देणारी कायमस्वरूपी व्यवस्था देखील समाप्त करतील. यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असेही बायडेन म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.