Vladimir Putin : शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भारत दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Russian Foreign Minister Sergei Lavrov) यांनी याबाबतची माहिती दिली. आता आमची वेळ असल्याचे म्हणत त्यांनी या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध निर्णायक वळणावर पोहोचले आहे. युद्धबंदी संदर्भात अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. यादरम्यानच आता पुतिन हे भारत दौऱ्यावर (Vladimir Putin India visit) येणार आहे. या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. (Vladimir Putin)
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी माहिती दिली की, पुतिन यांनी मोदींकडून आलेले भेटीचे निमंत्रण स्विकारले आहे. या दौऱ्याची तयारी सुरू आहे. मात्र, तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तसेच, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर पहिल्यांदा परदेशी दौऱ्यासाठी रशियाचीच निवड केली होती, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी जुलै 2024 मध्ये रशिया दौरा केला होता. यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी एका आर्थिक परिषदेचा भाग म्हणून या देशाचा दौरा केला होता. मागील दौऱ्यात मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.
(हेही वाचा – Bhaskar Jadhav यांचे स्वप्नभंग; jacket चढवले अन् आठ दिवसात उतरवले!)
दरम्यान, रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मे 2025 मध्ये रशियाचा दौरा करू शकतात. पंतप्रधान मोदी 9 मे रोजी मॉस्कोमधील रेड स्क्वेअरवर ग्रेट पॅट्रियॉटिक वॉरमधील विजयाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या परेडला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परेडमध्ये भारतीय लष्कराची (Indian Army) एक तुकडी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community