अरुणाचल प्रदेशवरील चीनचे दावे पूर्वीही हास्यास्पद होते आणि आजही हास्यास्पद आहेत. कारण अरुणाचल भारताचा नैसर्गिक भूभाग असल्याचे सांगत (S. Jaishankar) एस जयशंकर यांनी चीनला सडेतोड उत्तर दिले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या (एनयूएस) इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (आयएसएएस) येथे ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकावरील व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान एस जयशंकर यांनी हे भाष्य केले. (S. Jaishankar)
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांनी कोठडीतून लिहले पत्र; म्हणाले…)
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग :
चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर (S. Jaishankar) यांनी त्यावर भाष्य केले होते. अलीकडेच, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेश हा चीनचा नैसर्गिक भाग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदन जारी करून चीनचे दावे खोडून काढले आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले होते. याच मुद्यावर भाष्य करताना एस. जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की, “अरुणाचल प्रदेशवरील चीनचे दावे पूर्वीही हास्यास्पद होते आणि आजही हास्यास्पद आहेत. कारण अरुणाचल भारताचा नैसर्गिक भूभाग आहे.”
Speaking at @ISASNus Distinguished Lecture event on #WhyBharatMatters. https://t.co/v7K4TvWceX
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) March 23, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या नितिन गडकरी विरुद्ध कोण ?)
भारताला एक स्थिर आणि शांत शेजारी हवा आहे :
तसेच पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर परराष्ट्र मंत्री (S. Jaishankar) म्हणाले की, “पाकिस्तान आता जवळपास औद्योगिक स्तरावर दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. अशातच दहशतवादाकडे भारत दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद ही क्षणार्धात होणारी घटना नाही. ही निरंतर चालत राहते. पाकिस्तानात दहशतवाद हा उद्योग असल्यामुळे या धोक्याचा सामना करण्यासाठी एक पद्धत शोधावी लागणार असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत, असेही जयशंकर यांनी सांगितले. भारताला एक स्थिर शेजारी हवा आहे. दुसरे काही नाही तर तुम्हाला किमान शांततापूर्ण शेजारी हवा असतो, असे देखील जयशंकर यांनी स्पष्ट केले. (S. Jaishankar)
A very productive interaction with leading Singaporean Corporate figures.
Appreciate their positive feedback on the India growth story, based on investment experiences.
Confident that their commitment to doing more business in India will further increase. pic.twitter.com/J014UI4A7s
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) March 23, 2024
हेही पहा –
Join Our WhatsApp Community