एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी भारत आणि चीनच्या (China) संबंधांची चर्चा केली. जगाच्या दृष्टीने चीन ही सामान्य समस्या असली तरी भारताच्या दृष्टीने चीन ही विशेष समस्या आहे आणि त्याचे स्वरूप अधिक गंभीर आहे. सीमेवरील स्थिती आणि चीनबरोबर भारताचे संबंध कसे आहेत त्यावरून त्यांच्याकडून येणाऱ्या गुंतवणुकीची छाननी करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत.
(हेही वाचा –Kerala Film Industry मध्ये सेक्सची मागणी सामान्य; मेकअप आर्टिस्टने सांगितली काळी बाजू)
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले, “चीनबरोबरच्या व्यापारात तूट असल्याबद्दल लोक तक्रार करत असतील तर त्याचे कारण हे आहे, की काही दशकांपूर्वी आम्ही चीनमध्ये होणाऱ्या उत्पादनाच्या स्वरूपाकडे आणि त्यांना मिळणाऱ्या फायद्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. चीनचे अद्वितीय राजकारण, अद्वितीय अर्थकारण यामुळे तो देश एक अद्वितीय स्वरूपाची समस्या आहे. त्यांचे अद्वितीयपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, त्याविषयीची मते, निष्कर्ष आणि धोरणे सदोष असतील. चीनबद्दल चर्चा करणारे आपण जगातील एकमेव नाही. युरोपमध्ये प्रमुख आर्थिक किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या चर्चेत चीनचा विषय असतो. अमेरिकाही चीनच्या कुरापतींनी त्रस्त आहे.” याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.
(हेही वाचा –Police : खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्यासाठी पोलिसांनीच ड्रग्जचे पाकीट हळूच टाकले खिशात; खार पोलीस ठाण्याचे पथक निलंबित)
गुंतवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना जयशंकर (S Jaishankar) म्हणाले की, “चीनची समस्या भारतापुरतीच मर्यादित नाही. जेव्हा आपण चीनबरोबर व्यापार, गुंतवणूक, विविध प्रकारची देवाणघेवाण करतो, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने हा खूप वेगळा देश आहे, हे लक्षात घेण्याकडे दुर्लक्ष केले तर त्यातून अनेक मूलभूत गोष्टी सुटू लागतात. गेल्या चार वर्षांपासून भीरत-चीन सीमेवर खूप कठीण परिस्थिती आहे. ज्या देशांची सीमा चीनला लागून नाही, तेही तेथून होणाऱ्या गुंतवणुकीची छाननी करत आहेत. यासाठी त्यांनी अमेरिका, युरोपचे उदाहरण दिले. त्यामुळे चीनकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीची छाननी केली जाईल. त्यात मला वाटते की भारत-चीनदरम्यान सीमा आणि संबंधांची स्थिती यासाठी पूरक असावी.” असेही जयशंकर यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community