महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. असे असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सातत्याने राजकीय बैठका सुरू आहेत. या बैठका तात्काळ थांबवाव्यात, हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे, अशी तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग (violation code of conduct) केला आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
(हेही वाचा – Pak vs NZ T20 Series : पावसापासून संरक्षणासाठी पाकमधील स्टेडिअमवर प्लास्टिक शिटचा वापर)
अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार
या तक्रारीची दखल घेत अखेर त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी एस चोकलिंग्मग यांनी सांगितले. त्याच बरोबर आता निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कार्यालयात बोलावले आहे. सावंत यांना 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे तक्रार ?
वर्षा या शासकीय निवासस्थानी आचारसंहितेमध्ये राजकीय बैठका होत होत्या याची तक्रार मी निवडणुक आयोगाला केली होती. माध्यमांमधून मुख्यमंत्री कार्यालयाने अशा बैठका झाल्याच नाहीत असे निवडणूक आयोगाला कळवले आणि निवडणूक आयोग माझ्याचकडे पुरावे मागणार आहे असे समजले. निवडणूक आयोगाने मला… https://t.co/1kPNvpteiP
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 16, 2024
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या एक्स या खात्यावरून तक्रार करताना म्हणाले की, वर्षा (Varsha Bungalow) बंगल्यावर होणा-या राजकीय बैठकांच्या संदर्भात निवडणूक आयोगाचे सर्वप्रथम लक्ष वेधत. देशात आचारसंहिता लागू होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तात्काळ थांबायला हव्या. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे. निवडणूक आयोगाने याची अजून दखल घेतलेली नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी जागे आहे का? कारवाई करा, अशी मागणी ही यावेळी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community