2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने हुतात्म्यांच्या नावाचा वापर केला होता आणि आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते प्रभु श्रीरामाच्या नावाचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant to EC) यांनी केला आहे.
(हेही वाचा – Ratnagiri-Sindhudurg : नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे राऊतांच्या उरात धडकी, कोकणी जनता यंदा दाखवणार दादांवर विश्वास)
धार्मिक चिन्हांचा वापर करणे प्रतिबंधित
भाजपाचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी मुंबईतील मोगरा मेट्रो स्टेशनवरील होर्डिंगवर पंतप्रधानांचे रामलल्लाची पूजा करतांनाचे छायाचित्र लावले आहे. त्यावर ‘जो राम को लाए है, हम उनको लाएंगे’, असा संदेश आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन आहे. 1951च्या लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 123/3 मध्ये धर्माच्या आधारे मतदान करणे आणि धार्मिक चिन्हांचा वापर करणे प्रतिबंधित आहे, असे म्हणून सचिन सावंत यांनी भाजपावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
In last 2019 parliamentary elections BJP used the name of martyrs and now in 2024 parliament election they are using the name of Bhagwan Sriram for appealing voters to vote. A hoarding at Mogra metro station of BJP has a photograph of BJP’S North Mumbai candidate Piyush Goyal and… pic.twitter.com/IYvyFPxTYz
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 19, 2024
वर्षा बंगल्याचा वापर केल्याच्या प्रकरणीही तक्रार
यासह सचिन सावंत यांनी वर्षा बंगल्याचा वापर निवडणुकीच्या कामासाठी केल्याच्या प्रकरणीही तक्रार केली आहे. महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. असे असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सातत्याने राजकीय बैठका सुरू आहेत. या बैठका तात्काळ थांबवाव्यात, हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे, अशी तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग (violation code of conduct) केला आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. (Sachin Sawant to EC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community