वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून मागितली खंडणी ! नितेश राणेंचा आरोप 

अंबानी स्फोटके प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा खंडणी मागत होता, त्याची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. 

अंबानी स्फोटके प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सोमवार, १५ मार्च रोजी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. वाझे यांच्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना आता नितेश राणे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

(हेही वाचा : वाझेंनंतर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार?)

काय म्हणालेत नितेश राणे?

  • देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचे लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल, तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती.
  • एक साधा एपीआय जेव्हा एवढे मोठे पाऊल उचलतो आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते उतरतात. सामनाच्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे, सचिन वाझेची कशी चूक नाही, हे सांगतात, तेव्हा त्याच्या मागची काही कारणे आहेत, हे समजून घ्या. सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे? ज्यामुळे त्याच्यासाठी शिवसेना सगळे पणास लावत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक साधा एपीआय सचिन वाझेची वकिली का करत आहेत?, असे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here