मला बळीचा बकरा बनवलं जातंय… काय सांगितले वाझेंनी न्यायालयात?

मला न्यायालयाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, असे वाझेने सांगितले.

81

अंबानी स्फोटके प्रकरणाचा एनआयएने तपास होती घेतल्यानंतर वाझे याला एनआयएने अटक केली. त्यानंतर एनआयएने त्याला न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा वाझेंनी आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचे सांगितले.

पोलिस कोठडी नको

मला बळीचा बकरा बनवंल जातंय असा सचिन वाझेंनी एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर दावा केला आहे. मी दिड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करुन झाली आहे, आता आणखीन पोलिस कोठडी देऊ नका, अशी सचिन वाझेने न्यायालयाकडे विनंती केली आहे. तसेच मला न्यायालयाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, असे वाझेने सांगितले. जे काही सांगायचं आहे ते लेखी देण्याचे एनआयए विशेष न्यायालयाने सांगितले.

(हेही वाचाः बुडत्याचा पाय आणखी खोलात… वाझेचे वाजले की बारा!)

हा दावा हास्यास्पद

सरकारी वकीलांनी वाझेंनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगितले. बचाव पक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद आहे असे सरकारी वकील एएसजी अनिल सिंह यांनी सांगितले. तसेच असे सांगताना स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं धमकीचं पत्रंच त्यांनी न्यायालयासमोर वाचून दाखवले. अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा। तुझे और तेरी पुरी फैमेली को उडाने का बंदोबस्त कर दिया है, अशी धमकीची भाषा वापरण्यात आल्याचे या पत्रात स्पष्ट दिसत आहे असे वकीलांनी सांगितले. तसेच स्कॉर्पिओमध्ये धमकीची दोन पत्रं होती असंही एनआयएकडून सांगण्यात येत आहे. दुस-या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते न्यायालयात वाचून न दाखवता, थेट न्यायमूर्तींना सोपवलं. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे सुनावणी झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.