शिवसेना आणि शिंदे गटाचे वाद-विवाद काही संपता संपत नाहीये. आम्ही उद्धव ठाकरेंवर कोणतेही गंभीर आरोप करणार नाही, असे म्हणणारेच शिंदे गटाचे नेते थेट मातोश्रीवर गंभीर आरोप करताना दिसताय. अशातच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करत ते म्हणाले की, मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला १०० कोटी रूपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
(हेही वाचा – वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी सोडली ठाकरेंची साथ अन् केला शिंदे गटात प्रवेश!)
दरम्यान, जाधव यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. यावेळी मेहेकरमध्ये गुलाबराव पाटलांची रॅली काढून जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले आहे.
दरम्यान, ५० खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असतं, असं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा हा दावा करून प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ५० खोके एकदम ओके म्हणून हिणवल्या जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच शंभर खोके एकदम ओके तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिले आहे. त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतंय का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Join Our WhatsApp Community