माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आल्याने, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे न्यायालयातील नियमित सुनावणीसाठी त्यांना आणू शकत नाही, असे तळोजा कारागृह प्रशासनातर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष न्यायालयानेही कारागृह प्रशासनाचे म्हणणे योग्य ठरवून वाझे यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला.
….म्हणून वाझे यांचा अर्ज फेटाळला
राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात वाझे यांनी अर्ज केला होता. तसेच त्यांना प्रकरणाच्या सुनावणीला हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. आपल्याला कारागृहातील दूरसंवाद प्रणालीद्वारे न्यायालयात हजर करण्यात येते. परंतु तांत्रिक कारणास्तव त्यात अडचणी येतात, परिणामी सुनावणीदरम्यान, काय झाले हे आपल्याला समजू शकत नाही, असा दावाही वाझे यांनी अर्जात केला होता. वाझे हे माफीचा साक्षीदार असल्याने, त्यांच्या जिवाला धोका असून, त्यांना नियमित सुनावणीसाठी आणणे शक्य नसल्याचे, कारागृह प्रशासनाने यावर उत्तर दाखल करताना, न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने कारागृह प्रशासनाचे म्हणणे मान्य केले व वाझे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
( हेही वाचा: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन )
Join Our WhatsApp Community