वाझे माफीचा साक्षीदार होणार?

91

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खंडणी वसुलीच्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची मागणी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात गुरुवारी केली. या मागणीला काही अटी आणि शर्तींसह मान्यता देण्याची शक्यता सीबीआयकडून वर्तवली जात आहे. यावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

मला माफीचा साक्षीदार करा

विशेष न्यायालयात वाझेच्यावतीने अॅड. रोनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करण्यात आला. माझ्या अटकेपूर्वी आणि अटेकनंतर मी नेहमीच सीबीआयला तपासात सहकार्य केले आहे. फौजदारी दंडसंहिता कलम 164 नुसार जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे फौजदारी दंडसंहितेच्या कलम 306 नुसार, मला माफीचा साक्षीदार करावे आणि जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी अर्जात केली आहे. या मागणीवर न्यायालयात 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी न्यायालयात हजर राहण्याची मागणीही वाझेने केली आहे. सुमारे 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह वाझेवर गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा: संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो” संभाजी राजेंचा विरोधकांना इशारा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.