सरवणकर यांनी Mahim मधून उमेदवारी मागे का नाही घेतली?

89
सरवणकर यांनी Mahim मधून उमेदवारी मागे का नाही घेतली?
  • खास प्रतिनिधी 

मुंबईतील बहुचर्चित माहीम मतदारसंघात अखेर तिरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो की शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेण्यास नकार का दिला? (Mahim)

मतदारसंघ चर्चेत

गेले काही दिवस माहीम मतदारसंघ माध्यमात खूपच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना उबाठाचे महेश सावंत हे उमेदवार आहेत. सरवणकर हे महायुतीचे उमेदवार असले तरी भाजपाने या एका जागेवर सरवणकर यांच्याऐवजी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

(हेही वाचा – Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार)

तिरंगी लढत पक्की!

तिरंगी लढत टाळण्यासाठी सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना विनंती केली होती. सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली असती तर शिवसेना उबाठा विरुद्ध मनसे अशी थेट लढत झाली असती आणि त्यात उबाठाचा पराभव होण्याची शक्यता अधिक होती. मात्र सरवणकर यांनी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार देत निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. (Mahim)

शिंदेंचा सल्ला

सोमवारी ४ नोव्हेंबर २०२४ या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही एकनाथ शिंदे यांनी सरवणकर यांची एक तास समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ‘तुम्ही राज ठाकरे यांना भेटून आपली बाजू मांडा’, असा सल्ला दिला. तर राज ठाकरे यांनी सरवणकर यांची भेट घेण्यास नकार दिला.

(हेही वाचा – मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी; Ashish Shelar यांचे आव्हान)

सरवणकर काँग्रेसकडून हरले

सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे अमित ठाकरे यांना निवडून येणे कठीण जाणार असून यात शिवसेना उबाठा महेश सावंत यांना मतविभागणीचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. २००४ पासून सदा सरवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २००९ मध्ये सरवणकर यांना शिवसेनेने तिकीट नाकारले काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली आणि हरले. आता ७० वर्षीय सरवणकर यांनी ३२ वर्षाचे युवा अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेणे अपेक्षित असताना त्यांनी नकार देत भाजपा आणि राज ठाकरे यांचा रोष ओढवून घेतला. (Mahim)

दावा कायमचा जाईल

२००४, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा निवडून आल्याने एकदा हा मतदारसंघ सोडला तर मतदारसंघावरील दावा कायमचा गमवावा लागेल. सरवणकर यांचा मुलगा समाधान माजी नगरसेवक असून परंपरागत दावा सोडल्यास गेल्यास भविष्यात मुलासाठी पुन्हा मिळवणे अशक्य असल्याची भीती हे एकामेव कारण असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर कसोटीतील ‘हा’ नकोसा विक्रम)

मतविभागणी कशी होणार?

माहीम मतदारसंघात शिवसेनेची मते जवळपास ४०,०००-४५,००० असून मनसेदेखील तितकीच ताकदीची मते आहेत. तर भाजपाचीदेखील साधारण ३०,००० मते असल्याचे २००४ पासूनच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपा वेगळे लढले त्यावेळी भाजपा उमेदवारला ३३,४४६ मते मिळाली होती तर सेना ४६,२९१ आणि मनसे ४०,३५० अशी मते पडली होती. त्यामुळे अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना उबाठा अशी थेट लढत झाली असती तर महायुती अधिक मनसेमुळे अमित यांच्या विजय सोपा होता तर आता तिरंगी लढतीमुळे सरवणकर आणि अमित यांच्यातील मतविभागणीचा लाभ उबाठाचे सावंत यांना होऊ शकतो. (Mahim)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.