Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर

442
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या समोरील आव्हाने कमी करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दरवाजे आता बंद झाले आहे. या मतदार संघातून एकट्या सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अमित राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा फायदा नसून उलटे नुकसानच होणार आहे. त्यामुळे महेश सावंत यांनी जर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी निवडणूक लढवणे हे मनसेच्या पथ्यावर पडणारे आहे. सदा सरवणकर निवडणूक रिंगणात उतरल्यास आणि भाजपाने त्यांना साथ न दिल्यास अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची लॉटरी लागू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आपला अर्ज मागे घेतला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही मनसेने या मतदार संघात आपला उमेदवार उतरवण्याबाबत कोणतीही चर्चा केली नव्हती, असे माध्यमांशी बोलतांना सांगितले. त्यामुळे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांची भावना ही निवडणूक लढवण्याची असून कार्यकर्त्यांच्या भावना राखून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

त्यातच उबाठाचे उमेदवार महेश सावंत यांच्याही अर्ज माघारीची शक्यता कमीच झाली आहे. शनिवारी सांयकाळी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घटन करण्यात आले आहे. त्यामुळे महेश सावंत निवडणूक रिंगणात असताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना केवळ भाजपा पाठिंबा देणार नाही म्हणून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावणे हे म्हणजे महेश सावंत यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासारखे आहे. सरवणकर निवडणूक रिंगणात नसल्यास महेश सावंत यांना मैदान मोकळे मिळणार असून शिवसेनेची मतदान सावंत यांना होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणे आवश्यक असल्याने सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी निवडणुकीतून माघार न घेणेच मनसेसाठी फायद्याचे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मनसेला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा भाजपाने यापूर्वीच केलेली आहे, त्यामुळे सदा सरवणकर यांना भाजपाची मते मिळणार नाही. त्यामुळे सदा सरवणकर यांना विजयासाठी आपली ताकद अधिक लावावी लागणार आहे. परंतु शिवसेनेची दोन छकले पडल्याने स्वत:च्या मतदारांच्या जोरावर सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे निवडणून येणे कठिण आहे,असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

दीपोत्सवावरील आक्षेपाचा उबाठाला फटका

मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) मागील १२ वर्षांपासून दीपोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये इंजिन चिन्ह असलेले आकाश कंदिल लावण्यात आले आहे. या कंदिलांवर मनसे चिन्ह असल्याने याला उबाठा शिवसेनेकडून हरकत घेण्यात आली,तसेच याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अमित ठाकरे (Amit Thackeray) उपस्थित राहिल्याने आणि ते स्वत: या मतदार संघातून निवडणूक लढवत असल्याने याचा सर्व खर्च उमेदवार म्हणून त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ठ करावा अशाप्रकारची उबाठा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दीपोत्सव हा हिंदूंचा सण असून त्याला एकप्रकारे आक्षेप घेतल्याने विभागातील जनतेमध्ये उबाठा शिवसेना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने स्वत: याची दखल घेणे वेगळे आणि उबाठा शिवसेनेने यावर आक्षेप नोंदवून तक्रार करणे वेगळे असल्याने एकप्रकारे उबाठाची प्रतिमा हिंदूविरोधी बनत चालली आहे. त्यामुळे याचा फटका माहीममध्ये बसण्याची शक्यता आहे.

माहीम विधानसभा मतदार संघात अशी आहे पक्षनिहाय अपेक्षित मतदारांची टक्केवारी

प्रभाग १८९ : अपेक्षित मतदार (काही बुथ: मतदार मनसे ५० टक्के, उबाठा शिवसेना ४० टक्के, शिवसेना १० टक्के)

प्रभाग १८२ : अपेक्षित मतदार मनसे २० ते २५टक्के, उबाठा शिवसेना २५ टक्के, शिवसेना २५ टक्के, भाजपा २५ टक्के

प्रभाग १९० : अपेक्षित मतदार मनसे ३० टक्के, भाजपा ३० टक्के, शिवसेना २० टक्के, उबाठा शिवसेना २० टक्के

प्रभाग १९१ : अपेक्षित मतदार उबाठा शिवसेना ३०, मनसे ३० टक्के, भाजपा ३० टक्के, शिवसेना १० टक्के

प्रभाग १९२ : अपेक्षित मतदार उबाठा शिवसेना ३०टक्के, मनसे २० टक्के, भाजपा ३० टक्के, शिवसेना २० टक्के

प्रभाग १९४ : अपेक्षित मतदार शिवसेना ३० टक्के, उबाठा शिवसेना २० टक्के, मनसे ३० टक्के, भाजप २० टक्के

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.