‘स्मशानात जा आणि भुतांशी बोला’, खोतांचा परबांवर घणाघात

ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन अद्याप सुरूच आहेच. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात राज्यभरातील शेकडो एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात तळ ठोकून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, म्हणून बसले आहे. अशापरिस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सातत्याने चर्चेसाठी आवाहन केलं जात आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी अनिल परबांवर केला आहे.

(हेही वाचा – अबकारी करात मोठी कपात, महाराष्ट्रात इम्पोर्टेड स्कॉच व्हिस्की स्वस्त)

आंदोलकांना मैदानाबाहेर जाण्यास मज्जाव

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात पुर्णतः टाळाटाळ करण्यात येत आहे. या कारणांमुळे आम्ही परिहन मंत्री अनिल परब यांना साडी चोळी देणार असल्याचे कामगारांनी ठरवले असून कोणत्याही परिस्थितीत परब यांच्या बंगल्यावर आम्ही धडकणार, असा निर्धार व्यक्त करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान परिसर हादरून सोडला. शेकडोच्या संख्येने एसटी कामगार जमल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र पोलिसांनी बॅरिकेटींग करून आंदोलकांना मैदानाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे समस्त कर्मचाऱ्यांमध्ये आक्रमकतेची भावना होती.

विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसाची नाही

एसटी कामगारांचा संप मागे घ्या, एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करेन मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले. तर एसटी विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल, असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here