नेमके एसटीच्या प्रश्नावरच पवार गप्प का? सदाभाऊ खोतांचा थेट सवाल 

मागील १० दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात बसले आहेत, बेमुदत संप सुरु आहे, एसटीचे नुकसान होत आहे, पण शरद पवार हे केवळ मध्य मार्ग काढू इतकेच बोलत आहे, त्याउपर मौन बाळगून आहेत, असे का?  कामगारांनी तुम्हाला मोठे केले, असे तुम्ही सांगता, तर मग त्याच कामगारांचे अश्रू पवारांना का दिसत नाहीत?, असा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

५० वर्षांत पवारांनी एसटीचा घात केला! 

एसटीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची एकमेव मान्यता प्राप्त संघटना आहे, ५०-६० हजार सदस्य संख्या या संघटनेची आहे. राज्य सरकार या संघटनेशीच चर्चा करते, मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा ती संघटनाही गप्प आहे. मागील ५० वर्षांत शरद पवार यांनीच एसटीचा घात केला आहे, असा घणाघाती हल्लाही खोत यांनी केला.

(हेही वाचा एसटीचे सरकारीकरण नव्हे तर खासगीकरण?)

पवारांना कामगारांचे अश्रू दिसेना

शरद पवार एसटीच्या प्रश्नावर मध्य मार्ग काढू, असे म्हणतात, मग आम्ही तरी कुठे म्हणतोय की आडवळणाने जाऊ. मध्यम मार्ग काय आहे तो पवारांनी सांगावा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमचा त्यांचा मध्य पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आले नाही. राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. एसटीच्या कामगारांनी मला मोठे केले असे तुम्ही अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू शरद पवारांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. शरद पवार पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम शरद पवार करत नाहीत, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here