सांगली येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबतबोलताना आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले, शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे, असे म्हणत सदाभाऊंनी पवारांवर बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पवार साहेब महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या लावण्यापलिकडे काहीही केलेले नाही. जाईल तिथे आग लावायची आणि परत दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे. आयुष्य त्यांचे आग लावण्यातचे गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आता थांबले पाहिजे असे म्हणाताना सदाभाऊ खोत यांनी एका घरात आग लावायची तिथले झाले की दुसऱ्या घरात आग लावायला जायचे काम शरद पवार करतात असल्याची टीका केली.
(हेही वाचा – … तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारतो का? शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल)
हे सरकार लुटारू आहे
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ईडीच्या धाडी येड्यांवर पडत आहेत. सज्जनांना ईडीचा काहीही त्रास नाही, असेही सदाभाऊंनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलावरुन त्यांनी महाविकास आघाडीला कडक इशाराही दिला. वीजबील मागाल तर दांडक्याने सोलून काढू, संपूर्ण वीजबील तुम्हाला माफ करावचं लागेल, असा गर्भित इशारा सदाभाऊ खोत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. हे सरकार लुटारू असून यांना वसुली शिवाय दुसरे काहीच येत नसल्याचीही टीका खोत यांनी केली.