पवार कुटुंबापासून आम्हाला धोका असल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते. त्यांना आता केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
आतापर्यंत अनेकांना देण्यात आलीय सुरक्षा
आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे. सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणा-या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण 11 सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिका-यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत, रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.
( हेही वाचा: बाळासाहेबांच्या पश्चात मराठीला उतरती कळा; भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )
मी शांत बसणार नाही
सदाभाऊ खोत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. विशेषत: पवार कुटुंबाकडून आपल्याला धोका असल्याचे सांगितले होते. ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. माझा जीव गेला तरी चालेल पण तुमची व्यवस्था आणि मस्तावालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community