रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता टोला लगावला होता. काही जण निवडणूक होण्यापूर्वीचं मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही, असे शरद पवारांनी म्हटले. पवारांच्या या वक्तव्यांवर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत
येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की असल्याचं ट्विट करत सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सदाभाऊ खोत यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – एसटी संपाचं ‘ते’ पत्र व्हायरल; कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार? महामंडाळानं दिलं स्पष्टीकरण)
'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांना, मी येऊ दिलं नाही.!'- शरद पवार
.
.
.
येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच..— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) March 7, 2022
पवारांचा फडणवीसांना टोला
संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही, ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकालापूर्वीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असे शरद पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community