महत्त्वाच्या बैठकींसाठी मंत्रालयाऐवजी Sahyadri अतिथीगृहच केंद्रबिंदू

41
महत्त्वाच्या बैठकींसाठी मंत्रालयाऐवजी Sahyadri अतिथीगृहच केंद्रबिंदू
  • प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या महत्त्वाच्या बैठका मागील काही दिवसांपासून मंत्रालयाऐवजी सह्याद्री (Sahyadri) अतिथीगृह येथेच घेण्यात येत आहेत. शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्व प्रमुख बैठका देखील मंत्रालयात न होता सह्याद्री (Sahyadri) अतिथीगृहातच आयोजित करण्यात आल्या आहेत. (Sahyadri)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध उच्चस्तरीय आढावा आणि धोरणविषयक बैठका याठिकाणी पार पडत असल्याने सह्याद्री (Sahyadri) अतिथीगृह प्रशासनिक चर्चांचा केंद्रबिंदू ठरले आहे.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill चे समर्थन केले म्हणून वृद्धाला धर्मांध मुस्लिम कट्टरपंथींकडून मारहाण; रिजवान आणि नौशादसह ३ जणांना अटक)

मंत्रालयामध्ये नेहमीप्रमाणे बैठका घेण्याऐवजी सह्याद्री (Sahyadri) परिसरात सुरू असलेल्या बैठकीमुळे अधिकारी, कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींमध्ये उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली आहे. सुरक्षा व्यवस्था, गोपनीयता आणि एकाच ठिकाणी अनेक बैठकांची योजना करण्याच्या दृष्टिकोनातून सह्याद्री अतिथीगृहाचा पर्याय निवडण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. (Sahyadri)

दरम्यान, बैठकीचे ठिकाण सातत्याने बदलले जाण्यामुळे मंत्रालयातील नियमित कामकाजावर त्याचा काहीसा परिणाम होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हा बदल तात्पुरता आहे की नव्या कार्यपद्धतीचा भाग, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे. (Sahyadri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.