दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परबांनीच बांधले – किरीट सोमय्या

77

जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथप्रत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्ट, दापोली रिसॉर्टच्या जमीनीचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे घोषित केले होते. मूळ मालक विभास साठे यांच्याकडून मुरुड गावातील ही जमीन एक कोटी रुपयांत खरेदी केल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परबांनीच बांधले हे सिद्ध होते, असा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी केला.

( हेही वाचा : चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई! देशात ५६ ठिकाणे छापे)

या संबंधी अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवरी याप्रकरणी सुनावणी होणार असून, किरीट सोमय्या यांनी त्यात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. महावितरण कंपनीने किरीट सोमय्या यांना दिलेल्या माहितीत, अनिल परब यांनी या रिसॉर्टचे बांधकाम करण्यासाठी ३ फेज मीटर वीज जोडणी ५ मार्च २०२० रोजी घेतली. या १२ महिन्यांत वीजेचे बिल अनिल परब यांच्याच नावाने येत होते। अनिल परब स्वतःच्या बँक खात्यातून वीज देयकाचे भरणा करत होते. ४ मार्च २०२१ रोजी हा वीज जोडणी संच सदानंद कदम यांच्या नावे हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

२६ जून २०१८ रोजी अनिल परब यांनी स्वतःच्या सहीने दापोलीतील मुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पत्र लिहिले. शिवाय विभास साठे यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन अनिल परब यांनी घेतली व त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम अनिल परबच्या नावे करण्यात यावे, असा अर्जही देण्यात आला, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

घरपट्टीही परबांनी भरली

  • या रिसॉर्टची वर्ष २०१९-२० ची घरपट्टी १४ नोव्हेंबर २०१९ रोजी (४६ हजार ८०६) अनिल परब यांनी स्वतःच भरली होती. २०२०-२१ ची घरपट्टीही त्यांनीच भरली.
  • त्याच्या पावत्या आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.

कारवाई होणारच

  • दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांनी राष्ट्रीय हरित लवादात दाखल केलेल्या शपथपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांनी जमीन मे/जून २०१७ मध्ये अनिल परब यांना विकली व त्याचा ताबा दिला. त्यावरील सर्व बांधकाम हे अनिल परब यांनी केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
  • अनिल परब यांनीच दापोली येथील साई रिसॉर्टची जमीन विकत घेतली, ताबा घेतला, बिनशेती परवानगीकरीता अर्ज त्यांच्याद्वारेच करण्यात आले.
  • त्यावरील बांधकाम त्यांनीच केले, त्याची घरपट्टी, मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या खात्यातून भरली, लॉकडाऊनमध्ये या रिसॉर्टचे बांधकाम गतीने करण्याचे कामसुद्धा अनिल परब यांनीच केले. त्यामुळे यांच्यावर कारवाई होणारच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.