Saif Ali Khan : गुन्हेगारीला धर्माशी जोडणे हे गैर आहे; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य

63
Saif Ali Khan : गुन्हेगारीला धर्माशी जोडणे हे गैर आहे; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य
  • प्रतिनिधी

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “राज्य सरकार या प्रकरणात तातडीने कारवाई करेल. सैफ अली खान यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.”

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्यावर भाष्य करत, त्याला धार्मिक कट्टरतेचा संदर्भ दिला. त्यांनी म्हटले की, “सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यावरून टार्गेट केले जात होते. हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. पोलिसांनी या दिशेनेही तपास करावा.”

(हेही वाचा – Vande Bharat Sleeper ट्रेनची ट्रायल रन यशस्वी)

जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर योगेश कदम यांनी प्रतिउत्तर देत म्हटले की, “गुन्हेगारीला धर्माशी जोडणे हे गैर आहे. हल्ल्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारचा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये.”

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, हल्ल्याचा खरा उद्देश आणि आरोपींवर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे लीलावती इस्पितळाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.