बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट)चे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर अॅम्बुलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा: रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखद; आता रेल्वे स्थानकावर मिळणार ‘ही’ अनोखी सुविधा )
मागच्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते
संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शिरसाट यांना आता पुढील उपचारांसाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच त्यांना सोमवारी रात्री ह्रदयविकाराचा झटका आला.
Join Our WhatsApp Community