बांगलादेशचे ज्येष्ठ पत्रकार आणि ब्लिट्झचे संपादक सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी भारतातील लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आणि सनसनाटी आरोप केला आहे. “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भारताच्या शत्रूराष्ट्रांशी संबंध असून त्याचे पुरावे दिले तर भारतात आगडोंब उसळेल, राहुल गांधी यांचे घर लोक पेटवून देतील, इतके मोठे काम राहुल गांधी यांनी केले आहे,” असे चौधरी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
राहुल गांधी तारिक रहमान यांची गुप्तपणे भेट
‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत चौधरी यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी यांना बांग्लादेशात होणाऱ्या उद्रेकाबद्दलदेखील माहिती होती. घटनेपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान यांची गुप्तपणे भेट घेतली होती. राहुल गांधींचे संबंध भारताच्या शत्रूराष्ट्रांशीसुद्धा आहेत, अशी माहिती शोएब चौधरी यांनी दिली.
(हेही वाचा – Badlapur School Case: बदलापूरच्या ‘त्या’ घटनेनंतर सरकारने शाळांसाठी काढला ‘जीआर’)
मानहानीचा दावा करावा
चौधरी यांनी त्यांच्या साप्ताहिक ‘ब्लिट्झ’मध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल सविस्तर बातमी प्रकाशित केली असून राहुल यांची प्रेम-प्रकरणे (फोटोसह), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लग्न कुणाशी झाले आणि त्यांना किती मुले आहेत, राहुल यांच्या कंपन्या, याबाबत सखोल माहिती दिली आहे. चौधरी यांनी ही माहिती प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसला आव्हान दिले आहे की राहुल गांधी यांनी ब्लिट्झ’मध्ये छापून आलेली बातमी खोडून काढावी किंवा मानहाणीचा दावा करावा, मग मी माझ्याकडे असलेले पुरावे उघड करेन, असे चौधरी यांनी आव्हान दिले आहे.
राहुल विंची
चौधरी यांनी पुढे सांगितले की राहुल गांधी यांचे दुसरे नाव राहुल विंची असून यांच्याकडे कॅरेबियन पासपोर्ट आहे. “आम्हाला कॅरिबियन देशात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची एक कंपनी सापडली आहे. त्याचे नाव ‘ला विंची कटारी’ आहे, जे नार्को पाणबुडीशी संबंधित आहे. कंपनी ड्रग्जची तस्करी करत असे. ती कंपनी त्यांची आहे की नाही याची आम्ही खात्री करत आहोत. एकामागून एक आम्ही खळबळजनक गौप्यस्पोठ करणार आहोत,” असे सांगून चौधरी म्हणाले की, “माझे कोणाशीही वैर नाही. पत्रकार म्हणून सत्य समोर आणणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही असे पत्रकार आहोत की ते आम्हाला पैसे देऊन विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना मी आवडत नाही. लोक आम्हाला अल्लाहचे शत्रू असेही म्हणतात. मला काही अडचण नाही. आम्ही सत्य समोर आणू. लोक मला इस्लामचाही शत्रू म्हणतात पण आम्ही थांबणार नाही,” असे चौधरी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community