आमदारांचे स्वीय सहायक आणि वाहन चालकांचे पगार वाढले

140

राज्यात सत्ताबदल होताच आमदारांचे स्वीय सहायक आणि वाहन चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला असून, प्रत्येकी पाच हजारांची वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. नुकताच त्यासंबंधीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला.

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या खासगी स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालक (ड्रायव्हर) यांच्या वेतनात प्रतिमहिना प्रत्येकी ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२२ पासून आमदारांच्या पीएला २५ हजारांवरून ३० हजार रुपये, तर ड्रायव्हरला १५ हजारांवरून २० हजार रुपये अशी वाढ देण्यात आली आहे. आमदारांच्या खासगी सहाय्यक आणि वाहनचालकांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याने, त्यात वाढ करण्याची मागणी होत होती. वाढती महागाई व सर्वच स्तरात झालेली वेतनवाढ लक्षात घेऊन वेतनात वाढ करण्याची मागणीही आमदारांनी विधिमंडळात केली होती.

( हेही वाचा: ‘सावरकरांचा सतत अपमान करणा-यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे’? )

…म्हणून वेतनात केली वाढ

आमदारांच्या पीएला आणि ड्रायव्हरला सातत्याने आमदारांसोबत राहावे लागते. आमदारांच्या मतदारसंघातही त्यांना फिरावे लागते. त्यामुळे घरासाठी वेळ देता येत नाही. अशी परिस्थिती असताना त्या तुलनेत फारच तुटपुंजे वेतन मिळते. कोणत्याही कामगाराला, व्यक्तीला कमीत कमी १८ हजार रुपये वेतन दिले जावे असे सरकारी (कामगार) कायदा सांगतो. मात्र आमदारांच्या वाहनचालकांना १५ रुपये वेतन दिले जाते. त्यामुळे वेतन वाढीच्या मागणीने जोर धरला होता. आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या वेतनात वाढ करणारे विधेयक मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केले होते. त्यानंतर राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात वेतनवाढीला मान्यता दिली होती. अखेर मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.