अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्तावरून राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर (Salim Kutta) संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सभागृहात केली आहे. या प्रकरणी गिरीष महाजन (Girish Mahajan) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांनी उत्तर दिले आहे.
(हेही वाचा – Abdul Sattar : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी १७० कोटींची तरतूद; अब्दुल सत्तार यांची माहिती)
एसआयटीमार्फत चौकशी करण्याची एकनाथ खडसे यांची मागणी
”१९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील (1993 mumbai blast) आरोप दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) नातेवाईकाच्या लग्नसमारंभात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांसह (Girish Mahajan) राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक हजर होते. मंत्री गिरीश महाजन यांचे दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्याने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. सुधाकर बडगुजरांवर तातडीने कारवाई करण्यात आली. अशा मंत्र्यांनी मंत्रीमंडळात राहणे किती योग्य आहे ? सरकारने या प्रकरणी तातडीने चौकशी करावी,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी १८ ऑक्टोबर रोजी विधानपरिषदेत केली. या वेळी त्यांनी एक छायाचित्रही दाखवले.
मंत्र्यांचे नाव कामकाजातून वगळण्याची मागणी
सलीम कुत्ता (Salim Kutta) प्रकरणावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. यानंतर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. गिरीष महाजन (Girish Mahajan) हे मंत्री असल्याने त्यांचे नाव कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
(हेही वाचा – Gyanvapi Survey : ज्ञानवापी मशीद कि आदि विश्वेश्वराचे मंदिर; 1500 पानांचा अहवाल सादर)
देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
”नाशिकमधील मुसलमान धर्मगुरु शेहरेखातीब यांच्या पुतण्याच्या लग्नाला गिरीश महाजनांसह अन्य पक्षांतील नेते आणि अधिकारी उपस्थित होते. शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले, त्यांच्या कुटुंबाचाही दाऊदशी कुठलाही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सभागृहात दिले आहे.
शेहरेखातीब यांचा दाऊदशी संबंध नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ”दाऊदशी संबंध असल्याचा गुन्हा शेहरेखतीब यांच्यावर नाही. तथापी, तेव्हा आरोप झाल्यानंतर तत्कालीन डीसीपीच्या आधारे मी चौकशी समिती नेमली होती. चौकशीनंतर डीसीपीचा अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आलं की, शेहरेखातीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही.
(हेही वाचा – Vijay Hazare Trophy : राजस्थानचा ३० धावांनी पराभव करत हरयाणाचा विजय हजारे चषकावर कब्जा )
एकनाथ खडसेंनी माफी मागावी
उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आल्यामुळे अशा प्रकारचे विषय आज आले असतील. पण खातरजमा न करता एका मंत्र्यावर आरोप करण्यात आले. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्ताबरोबर (Salim Kutta) नाचताना का दाखवली नाही ? मंत्र्यावर बेछूट आरोप केल्यावर एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे – गिरीष महाजन यांचा पलटवार
या प्रकरणी गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी सभागृहाच्या बाहेर उत्तर दिले आहे. गिरीष महाजन म्हणाले, ”एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. ही घटना ९ वर्षांपूर्वीची आहे. लग्न सलीम कुत्ता (Salim Kutta) यांच्या भावाचे होते. नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी सलीम कुत्ता (Salim Kutta) यांनी सहकार्य केले होते. माझाही सत्यानाश झाला आणि हा पुढे चालला आहे, या विचाराने खडसे बावचळले आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप केले आहेत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community