मुंबई महानगरपालिका सभागृहाचे महत्व लक्षात घेता जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत नाही तोपर्यंत महापालिकेचे सभागृह कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरण्यात येवू नये अशी मागणी समाजवादी पक्षाच्या माजी महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी महापालिका आयुक्त व प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
( हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळा, कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत)
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. परिणामी या महापालिका सभागृहाचे महत्व आणि पावित्र्य नष्ट होत आहे,अशी खंत त्यांनी या निवेदनात व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात महानगरपालिका सभागृह एक ऐतिहासिक वारसा असलेले सभागृह आहे. अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय कारकिर्द ही ऐतिहासिक सभागृहापासूनच सुरू झालेली आहे. महानगरपालिकेचे विश्वस्त म्हणून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरातील जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. मुंबई महानगरपालिकेची मुदत ०७ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका न झाल्यामुळे, ०८ मार्च, २०२२ पासून महानगरपालिकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु वर्षभराच्या कालावधीत असे निदर्शनास आले आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक सभागृहात अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. परिणामी, सदर महानगरपालिका सभागृहाचे महत्व आणि पावित्र्य नष्ट होत आहे. त्यामुळे जोपर्यंत महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचे सभागृह कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरण्यात येऊ नये. हि विनंती त्यांनी या निवेदनात केली आहे.
Join Our WhatsApp Community