सध्या हिंदू धर्माचा (Hindu Religion) अवमान करण्याची चढाओढ दक्षिणेतील आणि उत्तरेतील नेत्यांमध्ये लागली आहे. तमिळनाडू राज्यातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हा डेंग्यू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते, आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनीही हिंदू धर्माचा पर्यायाने हिंदूंच्या धर्म भावनांचा अवमान केला आहे.
काय म्हणाले स्वामी प्रसाद मौर्य?
सोमवार, २५ डिसेंबर रोजी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महा ब्राह्मण पंचायत या कार्यक्रमात सहभाग घेतला होता, त्या कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य हेही उपस्थित होते, त्यावेळी स्वामी प्रसाद मौर्य बोलताना म्हणाले, हिंदू धर्म (Hindu Religion) हा धर्म नाही, तर तो धोका आहे. काही लोकांचा हा धंदा आहे. मी या विषयी काही बोललो की, लोकांच्या लगेच भावना दुखावतात. पण सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा हिंदू धर्म (Hindu Religion) हा धर्म नसून ती जगण्याची पद्धती आहे, असे म्हटले होते. तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या नाही. पण मी काही बोललो कि लगेच पोटात दुखते.
(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना अयोध्यामध्ये निमंत्रण न देण्यामागील कारण गिरीश महाजनांनी सांगितले; म्हणाले… )
ब्राह्मणांकडून निषेध
दरम्यान याच कार्यक्रमात उपस्थित ब्राह्मणांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे निषेध नोंदवला. त्यावेळी यादव यांनीही ही बाब मान्य केली की कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात अशा प्रकारे काही बोलणं गैर आहे.
Join Our WhatsApp Community