-
खास प्रतिनिधी
वक्फ दुरुस्ती विधेयकाला समर्थन करणारे खोटे आणि विरोध करणारे खरे मुसलमान आहेत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खरे की खोटे हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – Waqf Amendment Bill 2025 : वक्फ सुधारणा विधेयकामुळे ‘हे’ १० प्रमुख बदल होणार)
अबू आझमी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की केंद्र सरकारने ट्रिपल तलाकचा मुस्लिम विरोधी कायदा केला, मुस्लिम समाजाला मशिडीबाहेर नमाज अदा करण्यास विरोध केला आहे आणि आता वक्फ दुरुस्ती विधेयक पारित केले. या विधेयकाला विरोध करणारेच खरे मुस्लिम आहेत, असे आझमी यांनी सांगितले. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Solapur जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; जमीन हादरली, जाणून घ्या तीव्रता किती होती?)
त्यानंतर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकाला त्यांच्या पक्षाने लोकसभेत विरोध केल्याचे सांगितले. तसेच भाजपाकडून केवळ वक्फच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप करत भाजपाच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आझमी यांच्या म्हणण्यानुसार वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारे उद्धव ठाकरे हिंदू की खरे मुस्लिम, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community