उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे, तिथे कालपर्यंत पक्षाच्या आवाक्याच्या दृष्टीने प्रादेशिक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढवून राष्ट्रीय होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तेथील समाजवादी पक्षासोबत युती करून तिथे भाजपाला पराभूत करण्याची भाषा अनेकदा राऊत यांनी केली आहे. त्यावर राऊत यांचा हिरमोड करणारे ट्विट भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
काय म्हणाले भातखळकर?
सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊत विविध वक्तव्य करून लक्ष वेधून घेत आहेत. समाजवादी पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य छोट्या पक्षांना १० जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हणाले होते. परंतू आतून भातखळकर यांच्या ट्विटने फुग्यातील हवा काढून घेतली आहे. भातखळकर म्हणाले की, सपाने राष्ट्रवादी काँग्रेसला यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात.
सपाने @PawarSpeaks यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात. https://t.co/OdQxZk5O05
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 17, 2022
(हेही वाचा राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार का? कधी होणार निवाडा?)
राष्ट्रवादीचा हिरमोड…
नुकतेच राष्ट्रवादीचे केके शर्मा हे समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने ज्या मतदार संघातून निवडणूक लढणार होते, त्या जागेवर समाजवादी पक्षाचे होशियार सिंग हे निवडणूक लढवणार आहेत. त्यावरून आमदार भातखळकर यांनी मार्मिक ट्विट केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती महत्व मिळत आहे, हे भातखळकर यांनी अधोरेखित केले आहे.
Join Our WhatsApp Community