Love Jihad Committee : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर स्थापन केलेल्या समितीवर समाजवादी पक्षाचा आक्षेप; म्हणे रद्द करा !

Shraddha Walkar - Raees Sheikh : आंतरधर्मीय विवाह समितीचा हेतू अल्पसंख्यांक समाजाची बदनामी करण्याचा - आमदार रईस शेख यांचे आरोप

178
Love Jihad Committee : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर स्थापन केलेल्या समितीवर समाजवादी पक्षाचा आक्षेप; म्हणे रद्द करा !
Love Jihad Committee : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर स्थापन केलेल्या समितीवर समाजवादी पक्षाचा आक्षेप; म्हणे रद्द करा !

श्रद्धा वालकर या पालघर येथील मुलीची लव्ह जिहादमध्ये निघृण हत्या झाली. (Murder of Shraddha Walkar) तिचा प्रियकर अफताब याने तिच्या शरिराचे ३५ तुकडे करून तिच्या पार्थिवाची विल्हेवाट लावली होती. हे नृशंस अत्याचार उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती (Love Jihad Committee) स्थापन करण्यात आली.

या समितीवर समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (Raees Sheikh) आक्षेप घेतला आहे. ‘आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह -परिवार समन्वय समिती’ (Inter-Religious Marriage-Family Coordination Committee) ही अल्पसंख्यांक समाजाची बदनामी करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आली असून ती तात्काळ रद्द करावी’, असे आरोप करणारे पत्र समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (Raees Sheikh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), तसेच महिला-बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडे दिले आहे. रईस शेख यांनी या समितीला ‘लव्ह जिहाद’ समिती (Love Jihad Committee) असे संबोधले आहे.

समिती महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

तत्कालीन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) (८ मार्च २०२३) विधानसभेत समिती स्थापन करण्यामागील हेतू स्पष्ट केला होता. राज्यात ‘लव्ह जिहाद’ची (love jihad) लाखापेक्षा जास्त प्रकरणे असून यामुळे समाज व्यथित झाला आहे. तसेच राज्यात ‘श्रद्धा वालकर हत्येसारखे पुन्हा प्रकरण होऊ नये (Murder of Shraddha Walkar) आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समिती काम करेल’, असे लोढा यांनी स्पष्ट केले होते. तसेच ज्या महिलांचा तिच्या घरच्यांशी संपर्क तुटला आहे, अशा महिलांसाठी ही समिती काम करेल असेही त्यांनी सांगितले होते.

समितीकडे ४०२ तक्रारी

शेख यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण स्वत: महिला व बालविकास आयुक्त यांच्याकडून माहिती मागवली. तेव्हा समितीकडे २० मार्च २०२३ पर्यंत एकही तक्रार प्राप्त नसल्याची माहिती मला देण्यात आली. समितीकडे आजपर्यंत ४०२ तक्रारीच प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी सरकारला सभागृहात वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत,” अशी मागणीही आमदार शेख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.